Crop Insurance Maharashtra List : सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ दिला जाईल असे आश्वासन देण्यात येत होती. मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला दिलेला शब्द पाडत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसा जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कुठल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे.
कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले? Crop Insurance Maharashtra List
अग्रीम पीक विम्याची 25% रक्कम बीड जिल्ह्यामधील सात लाख 70 हजार शेतकऱ्यांची फायनल यादी करण्यात आलेली असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 241 कोटी एवढ्या निधीची वाटप करण्यात आलेली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यामधील सर्व महसूल मंडळांना पीक विम्याचे पैसे देण्यात आलेले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. गेल्या खूप दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट आतुरतेने बघत होते. यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळेल की नाही याची सतत चिंता भासत होती कारण पिक विमा कंपन्यांनी देखील महसूल मंडळातील शेतकऱ्यांवरती आक्षेप घेतलेला होता. मात्र राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर पिक विमा कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर त्यांचे पैसे जमा करण्यात यावे.
सरकार मार्फत देण्यात आलेल्या आश्वासनानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील खरीप हंगामामध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा विचार केला तर पावसाचे प्रमाण हे खूपच कमी आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी करून सुद्धा पाऊस न पडल्यामुळे बियाणे तसेच खतांचे व इतर मेहनत लागल्याचे पैसे पूर्णतः वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा Crop Insurance Maharashtra List
- ज्या पात्र शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण केली होती.
- ज्या मंडळामध्ये किंवा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे अशे शेतकरी.
- सलग 21 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पाऊस नाही अशा गावांमधील शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण झालेली आहेत अशे शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहेत अशी शेतकरी.
- ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.