स्मार्ट मीटर मुळे तुमच्या खिशाला होणार मोठा फटका! मोजावे लागणार १२ हजार? वाचा सविस्तर (Smart Meter Price)

Smart Meter Price: स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या वीज वापराबाबत अचूक आणि प्रगत माहिती मिळेल. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रति मीटर १२ हजार रुपये खर्च येईल. अदानी ट्रान्समिशन कंपनीला महाराष्ट्रात एकूण १०.५० लाख ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचे १,३०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. याशिवाय, महावितरणने अदानी व्यतिरिक्त इतर तीन कंपन्यांनाही स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट दिले आहेत.

Smart Meter Price
Smart Meter Price

केंद्र सरकार देईल 60 टक्के रक्कम

केंद्र सरकारच्या वीज वितरण पुनरुज्जीवन योजनेच्या माध्यमातून, राज्यातील वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार वीज वितरण कंपन्यांना प्रकल्प खर्चाच्या अंदाजे 60 टक्के रक्कम देईल.

ही योजना वीज वितरण क्षेत्राच्या विकासास चालना देण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक अचूक आणि पारदर्शक बिल देण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने (MSEDCL) आणि बेस्ट उपक्रमाने प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी निविदा काढल्या. बेस्ट उपक्रमाने अदानी ग्रुपला, तर MSEDCL ने अदानी ग्रुप, एनसीसी आणि मोटेकलोला कंत्राट दिले. सप्टेंबरपासून, या कंपन्यांना ग्राहकांच्या घरी मीटर बसवण्यास सुरुवात होईल.

दिलासा! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडरचे; नवे दर पाहूनच घ्या 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत