Smart meter will come now: नमस्कार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व राज्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला विरोध होत असला तरीही महावितरण कंपनीने या प्रक्रियेची गती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महावितरणाने कामासाठी नेमलेल्या एजन्सींना आदेश देण्यात आले आहेत. असेच करार करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
तर मित्रांनो फेब्रुवारी 2024 पासून, महावितरण कंपनी महाराष्ट्रातील सर्व विद्युत ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात करेल. तसेच विदर्भामध्ये एकूण 52 लाख 6 हजार 982 स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे 26 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

सर्व मीटर बदलण्याची प्रक्रिया 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2.41 कोटी ग्राहकांचे वीज मीटर बदलले जाणार आहेत.
विदर्भातील नागपूर शहरात सर्वाधिक स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. नागपूर शहरात एकूण 9 लाख 45 हजार 623 स्मार्ट मीटर बसवले जातील.
ज्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर रिचार्ज करतो त्याच पद्धतीने स्मार्ट मीटरवर रिचार्ज करता येणार आहे. यासाठी पोस्टपेड आणि प्रीपेड अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महावितरण कंपनीकडून हे सर्व काम एका खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सुरुवातीला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मॉन्टी कारलो आणि अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ येथे जिनस कंपनीकडे स्मार्ट मीटर बसवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या कंपन्या साधारणतः 27 महिन्यांमध्ये मीटर बसवण्याचे काम पूर्ण करणार आहेत. आणि या खासगी कंपन्यांकडे 93 महिने या स्मार्ट मीटरांकडे देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ट्रांसफार्मर आणि सबस्टेशनलाही स्मार्ट करण्यात येणार आहे. कारण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कंपन्यांना सुद्धा स्मार्ट व्हावे लागणार आहे. यामध्ये लवकरात लवकर डेटा सेंटर आणि जीपीएस यंत्रणा विकसित करण्याचे काम करण्यात येणार आहे.
तर आता जुन्या मीटरचे काय होणार?
महावितरण कंपनीने आतापर्यंत ग्राहकांच्या घरांमध्ये लावलेल्या जुन्या मीटरची काय करायची याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, नवीन स्मार्ट मीटर मोफत बसवले जाणार आहेत हे स्पष्ट केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार वीज वापरण्याचा अधिकार मिळणार आहे.
ग्राहकांना स्मार्ट मीटर प्रीपेड पद्धतीने वापरता येणार आहे. म्हणजेच, मीटरमध्ये पैसे भरल्यानंतरच वीज पुरवठा होईल. पैसे संपताच वीज बंद होईल. स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती देखील उपलब्ध असेल.
महाराष्ट्र मध्ये कुठे मीटर बसविण्यात येणार आहे?
जिल्हा | स्मार्ट मीटर |
अकोला | 3,83,525 |
बुलढाणा | 4,67,283 |
वाशिम | 1,92,151 |
अमरावती | 6,32,767 |
यवतमाळ | 5,00,910 |
चंद्रपूर | 4,14,667 |
गडचिरोली | 3,25,675 |
गोंदिया | 2,98,347 |
भंडारा | 2,91,883 |
वर्धा | 3,98,809 |
नागपूर शहर | 9,45,63 |
नागपूर ग्रामीण | 3,44,२25 |
स्मार्ट मीटरच्या वापरामुळे ग्राहकांना वीज वापराबाबत अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण मिळणार आहे. तसेच, वीज वापर कमी करण्यात मदत होईल आणि वीज बिलांवरील खर्च कमी होऊ शकतात.
स्मार्ट मीटर मुळे तुमच्या खिशाला होणार मोठा फटका! मोजावे लागणार १२ हजार? वाचा सविस्तर !